
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा येथील शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान ही घटना महामार्गावर असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. या प्रकरणात तिवसा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून 3 जणांना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे.
अमोल पाटील आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अज्ञात 3 ते 4 आरोपी हॉटेलजवळ आले व त्यांनी प्रथम अमोल पाटील यांच्या डोळ्यात मिरचीपावडर फेकली. त्यानंतर अमोलच्या डोक्यावर सपासप वार केले. यातच अमोल पाटीलचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तिवस्याच्या ठाणेदार रीता उईके घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. रीता उईके यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून पुढील तपास करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे.





























































