
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘ठाकरे’ आडनावावरून केलेल्या टीकेच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. ‘बाई, जरा दमानं घ्या’, असा खोचक सल्ला मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.
रूपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमधून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ‘ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱया डोक्यावर पडल्या आहेत’ असा खोचक टोला ठोंबरे यांनी लगावला आहे. मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या. आता जरा भानावर या. काहीही बिनबुडाचे बोलून का स्वतःचा अपमान करून घेता, असंही ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमृता राजकारणात येणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बाई, तुम्ही राजकारणात या, चांगले काम करा. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही काहीही बोलणे असे होत नाही, असेही ठोंबरे यांनी म्हटले आहे.






























































