आता दूधही महागले; अमूल दुधाच्या किमतीत लिटरमागे 2 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमूल दुध देशभरात महत्त्वाचा ब्रँड आहे. आता अमूल दुधाने देशभरातील दूधाच्या किमतीत प्रतिलिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या दरानुसार मंगळवारपासून ही वाढ होणार आहे. अमूल गोल्ड दुधाची किंमत अर्ध्या लिटरसाठी 30 रुपये, अमूल ताजा दुधाची किंमत अर्ध्या लिटरसाठी 24 रुपये तर अमूल शक्ती दुधाची किंमत अर्धा लिटरसाठी 27 रुपये करण्यात आली आहे.

गुजरात सहकारी दुध वितरक संघाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. दरवाढीला वर्ष पूर्ण होण्याआधीच ही दरवाढ करण्यात आली आहे. याआधी जुलै 2021 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. अमूल दुधाच्या सर्व ब्रँडसाठी ही दरवाढ लागू असेल. उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दूध उत्पादनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सुमारे 8 महिन्यातच पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे.