हिंदुस्थानी व्यक्तीला ऑस्ट्रेलियात 25 वर्षांचा कारावास

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या समुद्र किनारी एका 24 वर्षीय महिलेची हत्या केल्याच्या आरोपाखाली मूळचा हिंदुस्थानी असलेल्या व्यक्तीला 25 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना 2018 साली घडली होती. केर्न्स येथील सुप्रीम कोर्टाने राजविंदर सिंह याला टोया कार्डिगली हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत ही शिक्षा ठोठावली. हत्या केल्यानंतर सिंह ऑस्ट्रेलियात पत्नी, मुले आणि आई-वडिलांना सोडून हिंदुस्थानात पळून आला. पळून जाताना सिंह याने कुटुंबाशी संवाद सुद्धा साधला नाही. त्यामुळे सिंह याला केवळ स्वहित दिसते, असे न्यायाधीशांनी म्हटले.