
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी अनंत यांची प्रकृती खालावल्याने त्यांची एच. एन. रिलायन्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते.
































































