एक लाख वर्षांपूर्वी ‘असा’ दिसत होता मानव; संशोधकांनी बनवली प्रतिकृती

डार्विनचा उत्क्रांतीच्या सिद्धांतावरून वादविवाद होत असतात. मात्र, आता सुमारे एक लाख वर्षांपूर्वी मानव कसा दिसत असेल याबाबतचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर असणाऱ्या मानवांना डेनिसोवंस म्हणतात. या मानवाची हाडे गुलाबी रंगाची होती. त्यांचे नाक चपटे असून फक्त तीन दात आणि खालचा जबडा होता. संशोधकांनी अभ्यासातून मिळालेल्या या माहितीनुसार त्या काळातील मानवाची प्रतिकृती बनवली आहे.

काळाच्या ओघात नष्ट झालेली ही मानवाची प्रजाती सायबेरियापासून पूर्व आशियापर्यंतच्या भागात पसरली होती. अनुवंशशास्त्र आणि अभ्यासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधकांना या मानवाची प्रतिकृती बनवण्यात यश आले आहे. डेनिसोवंस प्रजातीतील मानवी सांगाड्यांच्या आधारे आम्ही या मानवाची प्रतिकृती बनवली असल्याचे इस्रायलच्या जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठातील संशोधक लिरान कार्मेल यांनी सांगितले. या मानवाचे काही बाबतीत निएंडरथल प्रजातीशी साम्य आहे. त्यांच्यातील काही गुण आपल्याशी साधर्म्य दाखवतात. तर काही बाबतीत ते एकदम वेगळे असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ही प्रतिकृती बनवण्यासाठी संशोधकांनी 56 एनाटोमिकल फिचरचा अभ्यास केला आहे. डेनिसोवंस, आधुनिक मानव आणि निएंडरथल प्रजातीपेक्षा ही प्रजाती वेगळेपण दाखवते. त्यांची कवटी या प्रजातींपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले आहे. याबाबतची माहिती जर्नल ‘सेल’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या