Video- अंधेरीच्या पेनिन्सुला इमारतीला आग

633

अंधेरी पश्चिम येथील पेनिन्सुला इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे.

ही 22 मजली इमारत व्यावसायिक इमारत असून या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. दरम्यान 11व्या मजल्यावरून तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

पाहा या घटनेचा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या