अंधेरी पूर्व विधानसभेच्या युवासेना विभाग युवती अधिकारी पदी नियुक्ती जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी (पू.) विधानसभेच्या युवासेना विभाग युवती अधिकारी पदी अक्षदा सावंत यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयाचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

युवासेना सहसचिवपदी नियुक्ती जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना सहसचिव पदी काजल तांबे यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती केल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

महिला संपर्क संघटक जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पुणे शहर महिला संपर्क संघटकपदी स्नेहल आंबेकर तर बारामती, दौंड, इंदापूर विधानसभा महिला संपर्क संघटकपदी मेघना काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.