ओडिशा -आंध्र सीमेवर बोट उलटली; एका मुलाचा मृत्यू, 8 मजूर बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशा आंध्र प्रदेश सीमेवरील सिलेरू नदीत एक बोट उलटली आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला असून 8 मजूर बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार चित्रकोंडा भागात सिलेरू नदीतून प्रवासी मजूर आपल्या घरी परतत होते. लॉकडाऊन लागल्याने या मजुरांनी घरची वाट धरली होती. प्रवासादरम्यान त्यांची बोट उलटली. त्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह सापडला आहे. तर इतर  8 मजूर बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. नदीमध्ये ही बोट नेमकी उलटली कशी हे अद्याप कळालेले नाही.