
सरकारने दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन देण्याचे आश्वासन पूर्ण केले नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवार, 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यासाठी 28 फेब्रुवारीला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानात धडकणार आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अर्ध्या पगाराएवढी पेन्शन द्या, सुसज्ज अंगणवाडी पेंद्रे द्या, कार्यक्षम मोबाईल द्या, या मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारणार आहेत.



























































