
राज्यभरात दीड महिन्यापासून मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात झालेल्या बैठकीनंतर आज स्थगित करण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होता. दरम्यान, 26 जानेवारीपासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत.

























































