
हिंगणघाट पीडितेचा मृतदेह गावात आणला तेव्हा त्याच रुग्णवाहिकेवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत रुग्णवाहिकेच्या काचा फुटल्या आहेत. अनेक संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न केला. या भागात पोलिसांना कडेकोट बंदोबस्त असताना इथला जमाव हिंसक झाला. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आला. जमवाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा तरुणीच्या कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे शहरात चांगलेच तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.





























































