
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे. देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळेपासून जवळपास तीन महिन्यांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत.

























































