
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अपिलावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने शुक्रवारी असमर्थता दर्शवली. सीबीआयने दाखल केलेल्या गुह्यामध्ये सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते आता सोमवारी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे जामिनासाठी दाद मागणार आहेत. अनिल देशमुख यांच्यातर्फे ऍड. निकम आणि ऍड. सिंग हे सोमवारी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे अपील सादर करणार आहेत.



























































