आदित्य ठाकरे, फडणवीस राज्यासाठी चांगले कम करतील; अनिल कपूर यांचा विश्वास

1594

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आज आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नायक आहेत. ते महाराष्ट्रासाठी चांगले काम करतील, असा विश्वास नायक चित्रपटातून एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणारे अभिनेते अनिल कपूर यांनी व्यक्त केला.

शहरातील एका शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संभाजीनगर शहराशी जुना संबंध आहे. ‘लाडला’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी येथे आलो होतो. त्यानंतर एका सिनेमागृहाच्या उद्घाटनास आलो होतो. आता पुन्हा या शोरूमच्या उद्घाटनासाठी शहरात येण्याचा योग आला आहे.

anil-kapur

या संवादात पत्रकारांनी अनिल कपूर यांना ‘आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुम्ही नायक चित्रपटात एक दिवस मुख्यमंत्री बनला होतात. त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीत खरा नायक कोण’, असा प्रश्न विचारल्यानंतर अनिल कपूर म्हणाले, आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. यासह देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. हे दोघेही महाराष्ट्रासाठी चांगले काहीतरी करतील. युवा नेते निवडून आल्यास हे देशासाठी चांगले राहील. मी कुठेही जातो तेथे नायकची चर्चा होते. मी अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. ते मला सांगतात की, तुमचा नायक चित्रपट पाहून आम्ही प्रभावित झालो, हे ऐवूâन मला आनंद होतो.

आपली प्रतिक्रिया द्या