महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

3030

शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते, अंत्यविधी नगर अमरधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अनिल राठोड यांना आठ दिवसापूर्वी श्वसनाचा त्रास झालेला होता ज्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, तपासणीदरम्यान त्यांना न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आले होते. चार दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

अनिल हे राठोड न्युमोनियातून बरे होत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना बरे वाटत होते, आणि त्यांनी हलका आहारही घ्यायला सुरुवात केली होती. मात्र बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे. अनिल राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनिल राठोड हे नगरमध्ये सुरुवातीला हिंदुत्ववादी संघटनांसाठी काम करत होते, हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा त्यांच्यावर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 1995 साली राठोड यांच्या गळ्यात पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली होती. त्यानंतर ते सलग पंचवीस वर्ष या शहराचे ते आमदार होते. शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर त्यांना अन्न अन्नपुरवठा मंत्रीपद मिळालं होतं. लोकांच्या सेवेसाठई सदैव तत्पर असणाऱ्या अनिल राठोड यांनी कोरोना काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अन्नछत्र सुरु केले होते. या काळात गरजूंना शक्य होईल तशी सगळी मदत त्यांनी उपलब्ध करून दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या