
सामना प्रतिनिधी, नगर
शहरात महापालिकेची निवडणूक सुरू असून निवडणूक आयोगाने अनेक वेगवेगळे नियम केले आहेत. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ परवानगी घेण्यातच वेळ वाया घालवावा, प्रचारच करू नये, अशी भूमिका आयोगाची आहे की काय असे चित्र आहे. त्यातही ज्यांची सत्ता आहे त्यांना सगळेच नियम माफ अशा पद्धतीने प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे. यंत्रणा राबवणारे अधिकारीही हतबल झाले असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
अनिल राठोड म्हणाले की, महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रभाग रचना मतदार यादी तयार करताना अनेक प्रकारचे घोळ झाले आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे उमेदवारांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात व प्रशासनाकडून परवानगी देताना होणाऱ्या अनोळखी संदर्भात निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर साऱ्या सहारिया यांना शिवसेनेने निवेदनही दिले. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून अडवणुकीचे प्रकार सुरूच आहेत निवडणूक यंत्रणा राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव येत आहे. सत्ताधारी आहेत म्हणून त्यांना सगळेच माप असे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विना परवाना परवाना सुरू असलेला प्रचार गाड्या पकडून दिल्या दबावाखाली सोडून दिल्या शेवटच्या काही दिवसात असेच चित्र राहिले. यांच्या दबावाखाली तर अखेरच्या दोन दिवसात मतदारांची अडवणूक, मशीनचे हेराफेरी, पैसे वाटण्याचे प्रकार होतील. त्यामुळे प्रशासनाला काहीच करता येणार नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झाली असल्याचे अनिल राठोड यांनी सांगितले.
निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया बोगसपणे सुरू आहे, असा आरोप करत निवडणुकीमध्ये नियमांचा भाऊ प्रशासन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नियमच लावायचे असतील तर ज्या तक्रारी दाखल झालेले आहेत आहेत, त्याच्यावर प्रशासनाने काय केले तीनशे कोटी रुपयांचे आमिष दाखवण्याच्या घोषणा जाहीरपणे होतात. त्याच्या अहवाल गोपनीय देतात हे आव्हान निवडणूक झाल्यावर उघडणार का, असा सवालही त्यांनी केला भाजपच्या प्रचारासाठी 38 एलईडी बँक शहरात फिरत आहेत. त्यातील एकही परवानगी दिलेली नाही, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवालही राठोड यांनी केला आहे आजही उमेदवारांना आठ-आठ तास रांगेमध्ये उभे राहून पण आम्ही घ्यावी लागत आहे एक खिडकी योजना ही सबसे ठरले आहे असेही ते यावेळी म्हणाले. निवडणूक यंत्रणा पूर्णपणे दबावाखाली असल्याचे आजच आमच्या निदर्शनास येत आहे हीच परिस्थिती शेवटच्या काही दिवसात राहिली त्यातून काहीही घडू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक पाळीव पातळीवरच्या प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरून दबाव आहे. ते तेसुद्धा कोणत्या प्रकारची उत्तरे देऊ शकत नाहीत, अशी सगळी अवस्था निर्माण झाली आहे. त्याचा फटका मात्र उमेदवारांना आता मतदारांना सुद्धा बसणार आहे त्यामुळे यासंदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आजही प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक 15 आदी ठिकाणी आमचे उमेदवार पडत असताना त्यांना लपवण्याचा प्रकार सुद्धा सुरू झाला आहे. उमेदवारांनी आमच्याकडे तशा तक्रारी केल्या आहेत आम्ही अशी गांभीर्याने दखल घेतली असून आम्ही त्याची लेखी तक्रार सुद्धा प्रशासनाकडे करणार असल्याचेही राठोड यांनी यावेळी सांगितले.
अशीच परिस्थिती राहिली तर भयंकर अवस्था नगर शहरामध्ये निर्माण होणार आहे. शेवटच्या दिवशी अनेक विषय घडण्याची शक्यता आहे व त्यांना रोखणे दादागिरी करणे, पैसा वाटपाचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले. नगर महानगर पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी ही ज्या ठिकाणी ठेवले आहे, ती लागली वस्तीत कशी काय ठेवले आहे, असा सवालही राठोड यांनी यावेळी उपस्थित केला एकंदरीतच यंत्रणाही दबावाखाली काम करत असल्याचेही आता दिसून येत आहे.































































