
सामना प्रतिनिधी । पुणे
शिवसेने सोबत युती व्हावी ही जशी आमच्या नेत्यांची इच्छा आहे तशी माझी ही आहे. मात्र, जर युती नाही झाली तर मतांचे विभाजन होऊन भाजपचे नुकसान होईल असे मत भाजप खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न झाल्यास त्याचा मोठा फटका पुण्यात भाजपला बसेल त्यामुळे युती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. लोकसभेसाठी भाजपकडे इच्छुक उमेदकारांची संख्या जास्त मोठी आहे. त्यामुळे उमेदकारी बाबत वरिष्ठ पातळीवर निणर्य होईल.
































































