
>> प्रभाकर पवार, [email protected]
निसर्गावर, भूसृष्टीवर, तांबड्या मातीवर प्रेम करणाऱ्या संजय गांधी उद्यानाच्या वनसंरक्षक व संचालक अनिता जयसिंग पाटील. उद्यानातील निसर्गाची हानी होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल यासाठी अनिता पाटील वेगवेगळे पर्यावरणपूक उपाम राबवीत असतात.
मुंबई शहराच्या उत्तरेला बोरिवली येथे संजय गांधी उद्यान असून या उद्यानात पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यावरणपूरक `ई- कार्ट’ची वाहतूक सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. वाहनांच्या धुराने पर्यावरणाची हानी होते हे लक्षात घेऊन संजय गांधी उद्यानात 10 नवीन बग्गी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपामाचे नुकतेच उद्घाटन झाले. त्या वेळी उपस्थित असलेल्या काही लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय उद्यानात वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी खासगी वाहनांची वाहतूक बंद केल्याने आपल्या भाषणात त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तेव्हा वनसंरक्षक अनिता पाटील या निराश झाल्या, परंतु वनमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला. ते म्हणाले, “मॅडम, तुमचे काम चोख आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे.” तेव्हा अनिता पाटील यांचा काहीसा उत्साह वाढला.
संजय गांधी उद्यान हे काही खासगी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुले नाही तेथे मुंबईला जलपुरवठा करणारे तलाव आहेत. जलशुद्धीकरण करणारा प्रकल्पही (भांडुप कॉम्प्लेक्समध्ये) आहे. अशा निषिद्ध परिसरात खासगी वाहनांना परवानगी देता येत नाही, परवानगी देणे धोक्याचे आहे. त्यामुळे अनिता पाटील यांनी बोरिवली ते भांडुप खिंडीपाडा यादरम्यान खासगी वाहनांना बंदी घातली आहे. उद्यानात वाहनांची गर्दी किंवा वाहतूक वाढली तर प्रदूषण वाढेल, पर्यावरणाचा समतोल बिघडेल असे अनिता पाटील सर्वांना सांगतात.
14 फेब्रुवारी 2025 रोजी संजय गांधी उद्यानाच्या वनसंरक्षक व संचालक म्हणून अनिता जयसिंग पाटील यांनी सूत्रे हाती घेतली. अनिता पाटील यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2010 साली भारतीय वन सेवा अधिकारी म्हणून महाराष्ट्र कॅडरमध्ये (घ्इए) निवड झालेली आहे. पृथ्वीचा अभ्यास करणाऱया अनिता पाटील यांनी भूविज्ञान विषयात बीएससी, एमएससी पदवी प्राप्त केली आहे. जीवसृष्टीच्या निर्मितीचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्या राज्य पात्रता पदवी परीक्षाही (एTिं) उत्तीर्ण झाल्या आहेत. इको टुरिझम नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि सामाजिक वनीकरण हे अनिता पाटील यांचे प्रावीण्याचे विषय आहेत.
संजय गांधी उधानाची सूत्रे हाती घेतल्यावर निसर्गाची हानी होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल यासाठी अनिता पाटील जीव तोडून (इको फ्रेंडली) वेगवेगळे उपाम राबवीत आहेत. संजय गांधी उद्यानाचे सौंदर्य वाढावे, पर्यटकांनी आकर्षित व्हावे यासाठी अनिता पाटील यांनी अलीकडे संजय गांधी उद्यानात 75 हजार झाडे रुजवली आहेत, उद्यान सुशोभित केले आहे, बग्गी सेवा सुरू केली आहे, महसूल वाढविला आहे. लायन, टायगर सफारीप्रमाणे लेपर्ड सफारी सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या दीड दशकाच्या शासकीय सेवेत त्यांनी वृक्षारोपण उपाम मोठय़ा प्रमाणात राबविले आहेत. अनिता पाटील सर्वांना याचे महत्त्व पटवून देतात, परंतु जैवविविधतेने नटलेल्या या उद्यानाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही झोपडीदादा करीत आहेत याची त्यांना खंत वाटते. आपल्याकडे अजूनही वृक्षरोपणाबाबत उदासीनता दिसून येते. हे सारे आपण जपले पाहिजे, त्यांचे संरक्षण केले पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे, असे अनिता पाटील सांगतात.
अनिता पाटील या आपल्या पेशाशी एकनिष्ठ आहेत तितक्याच त्या `डेअर डेव्हिल’ आहेत. नियमांच्या चौकटीत राहून त्या समाजोपयोगी निर्णय बिनधास्त घेतात. निसर्गावर, भूसृष्टीवर, तांबडय़ा मातीवर प्रेम करणाऱया या धाडसी महिलेला `लेडी सिंघम’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जीवसृष्टीच्या सखोल अभ्यासक अनिता पाटील यांना पालघर जिह्यातील आदिवासी समाजासाठी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल गोदावरी परुळेकर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. अनिता पाटील या सुसंस्कृत तसेच सांस्कृतिक वारसा जपणाऱया आहेत. त्या कायम पारंपरिक साडी या पोशाखात आपल्या कार्यालयात असतात. निसर्गाप्रमाणे ते आपल्या हिंदू व भारतीय संस्कृतीचेही जतन व संवर्धन करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.




























































