
निर्वासित तिबेटमधील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. पुढील वर्षी 1 फेब्रुवारी आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. धरमशाला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिबेटी निवडणूक आयोगाने ही घोषणा केली. जगभरातील निर्वासित तिबेटी लोक पहिल्या टप्प्यात आपल्या पसंतीचे उमेदवार निवडतील. त्यातून अंतिम निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले जातील. निर्वासित तिबेटच्या 17व्या संसदेचे अधिवेशन सप्टेंबरमध्ये पार पडले. त्यात तिबेटच्या एकजुटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या अधिवेशनात तिबेटमधील गंभीर परिस्थितीची चर्चाही करण्यात आली. 14 व्या दलाई लामा यांनी निर्वासित तिबेटी संसदेची स्थापना केली होती. तिबेटी संसदेत सध्या 45 सदस्य आहेत.