दिल्लीतील ‘अक्षरधाम’ 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-akshardham

नवी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर 13 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा जनतेसाठी खुले होणार आहे. सुरुवातीला संध्याकाळी 5.00 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मंदिर परिसरात प्रवेश दिला जाईल. सायंकाळी 7.15 वाजता मंदिर दर्शन, वॉटर शो, गार्डन, फूड कोर्ट व पुस्तके व गिफ्ट सेंटर सर्वांसाठी उपलब्ध होईल. अभिषेक, पूजा व सर्व देखावे मात्र तात्पुरते बंद राहतील.

कोविड -19 साथीच्या रोगाच्या प्रोटोकॉलनुसार, सर्वांना मास्क परिधान करणे आणि संपूर्ण परिसरातील सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक असेल. तसेच सर्व आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असेल. प्रवेशाच्या वेळी, थर्मल स्क्रिनिंग आणि हाताने सॅनेटाइज करणे सर्वांसाठी अनिवार्य असेल. ताप किंवा कोविड -19 ची लक्षणे जास्त असल्यास पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात येईल, असेही अक्षरधाम व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.