
पश्चिम रेल्वेवर लागू झालेल्या नव्या वेळापत्रकात एसी लोकलच्या 31 फेऱ्या समाविष्ट केल्याने साध्या लोकलची संख्या घटली आहे. सध्या असलेल्या 48 एसी लोकलची संख्या आता 79 इतकी झाली आहे. त्यामुळे सोमवारी कामकाजाच्या पहिल्याच दिवस बोरीवली स्थानकात मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. प्रवाशांची गर्दी प्रचंड झाल्याने एसी लोकलचे दरवाजेच बंद करण्यासाठी आरपीएफची मदत घ्यावी लागली. तर कल्याण सीएसएमटी एसी लोकलमध्ये बदललेल्या हवामानामुळे सकाळी एसीतून पाण्याची गळती लागल्याने तांत्रिक विभागाने दुरुस्ती केली.
View this post on Instagram
पश्चिम रेल्वेने शनिवार 1 ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक लागू केले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार कामकाजाच्या आज पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. एसी लोकलची संख्या वाढल्याने फलाटावर मोठी मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. अंधेरी व बोरिवली रेल्वे स्थानकात सकाळी पिकअवरला प्रचंड गर्दी झाली. बोरिवली रेल्वे स्थानकात तर एसी लोकलला प्रचंड मोठी गर्दी झाल्याने दरवाजे लागत नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाची मदत घ्यावी लागली.
पंधरा डब्यांच्या एसी लोकलची गरज
वातावरणात उष्णता वाढल्याने एसी लोकलची गरजेची झाली आहे. मात्र एसी लोकल वाढवल्याने साध्या लोकलची गर्दी वाढली आहे. सकाळच्या विरारच्या लोकल वाढविण्याची गरज आहे. नवीन वेळापत्रक काढताना किमान दोन आठवडय़ाआधी प्रवाशांना कळवायला हवे. तसेच 12 डब्यांच्या लोकलला आणखी तीन डबे एसीचे जोडून पंधरा डब्यांची एसी चालविण्याची गरज असल्याचे प्रवासी आशिष द्विवेदी यांनी सांगितले.




























































