हिंदूविरोधी वक्तव्य; पठाण याची बोलती बंद!

1356

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचा माजी आमदार वारिस पठाण याच्या हिंदूविरोधी चिथावणीखोर भाषणामुळे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे अडचणीत आले आहेत. देशभरात उमटलेले पडसाद आणि पक्षातील कुरबुरीनंतर अखेर ओवेसी यांनी वारिस पठाण याच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. वारिस पठाण याला मीडियासमोर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारिस पठाण याने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नयेत, असे सक्त आदेश त्याला देण्यात आलेले आहेत.

कर्नाटकात गुलबर्गा येथे सभेत बोलताना पठाणचा तोल गेला आणि तो बरळला. 100 कोटींवर (हिंदू) आम्ही 15 कोटी (मुसलमान) भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर मिळवावे लागेल, अशी धमकी ‘एमआयएम’चा माजी आमदार वारिस पठाणने दिली होती.

या विधानानंतर वारिस पठाण याने आपण कोणत्याही धर्माचे नाव घेतले नसल्याचा खुलासा केला होता आणि माफी मागण्यासही नकार दिला होता. मात्र हा मुद्दा यावर संपला नाही. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीदेखील वारिस पठाणच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. पठाण याला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या