पाकिस्तान नसता तर मोदींकडे बोलायला काहीच नसते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी कधी असे वाटते की, पाकिस्तान नसता तर मोदीजींकडे बोलायलादेखील काही नसते, असा टोला चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोदींना लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. काम तर मोदी तसेही तेव्हाच करतात जेव्हा कॅमेरे त्यांच्या आजूबाजूला असतात, असे म्हणत अनुरागने नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले आहे. अनुराग कश्यपने याआधीही ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच तो अनेक वेळा त्याच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलही होत असतो.