गृहपाठ पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक ऍपची मदत; ब्रेनलीच्या सर्वेक्षणात 77 टक्के विद्यार्थ्यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुट्टीत गृहपाठ पूर्ण करताना येणाऱया शंका आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी 77 टक्के विद्यार्थी शैक्षणिक अॅपची मदत घेत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. सुट्टीतील गृहपाठ सोडवताना विद्यार्थ्यांना आलेल्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने नुकतेच एक सर्वेक्षण केले. विद्यार्थी त्यांच्या शिक्षण प्रवासात आता शैक्षणिक अॅप्स आणि ऑनलाइन रिसोर्सचा सर्वाधिक वापर करीत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

सर्वेक्षणात 1,758 विद्यार्थी सामील झाले होते. 77 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले, सुट्टीतील गृहपाठाविषयी शंका आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी त्यांना शैक्षणिक अॅपची खूप मदत झाली. त्यामुळे नव्या काळातील विद्यार्थ्यांच्या जीवनात अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हेच यावरून अधोरेखित होते. कोणत्या विषयात जास्त मदत लागते, असे विचारल्यास 33 टक्के विद्यार्थ्यांनी गणिताची, 17 टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी तर 15 टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञानाची निवड केली.

  • 28 टक्के विद्यार्थी सुट्टीतील गृहपाठ करण्यासाठी ब्रेनलीसारखे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म वापरतात.
  • 67 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले, गृहपाठ करताना त्यांनी एकत्रितपणे समवयस्कांची मदत घेतली, तर त्यापैकी 58 टक्के विद्यार्थ्यांनी यासाठी त्यांच्या पालकांची मदत घेतली.
  • तरुण विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत अधिक स्वावलंबी आणि आत्मविश्वासू होत आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटी टूल्स आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे अशा प्रकारचे सामूहिक काम होत असल्याने त्यांच्या सहज उपलब्धतेमुळे शिक्षण प्रक्रियेत हा प्रवाह दिसून येत आहे.

शिक्षण घेण्यात अजूनही अडथळे

ब्रेनलीचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर राजेश बिसाणी म्हणाले, कोरोनाच्या उद्रेकानंतर देशातील शालेय क्षेत्रात उदयास येणारे प्रवाह अधोरेखित करण्याचा उद्देश या सर्वेक्षणामागे आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही वर्गखोलीबाहेर शिक्षण घेण्यात अडथळे येत आहेत. एडटेकद्वारे त्यांना माहितीच्या विश्वसनीय स्रोतांची विस्तृत श्रेणीच उपलब्ध होते. घरात राहून शिक्षण घेताना वैयक्तिक गरजा आणि प्राधान्यांकरिता विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने लर्निंग प्लॅटफॉर्म वापरत आहेत.