
सामना ऑनलाईन । मुंबई
बोरीवली काजूपाडा विभागात राहणार्या राजेश सुभाष म्हादलेकर या तरुणाच्या पाच महिन्यांच्या नीरजा या चिमुरडीच्या हृदयाला जन्मजात छिद्र असून त्यावर तातडीची शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. मात्र म्हादलेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी दानशूर व्यक्ती व संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे.
राजेश म्हादलेकर हे एका खासगी आर्किटेक्ट संस्थेत कार्यरत असून त्यांना दरमहा दहा हजार पगार मिळतो. त्यात घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्याने शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. गिरगाव येथील सर एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात नीरजाच्या हृदयावरील शस्त्रक्रियेकरिता २ लाख ६१ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तरी दानशूर व्यक्ती व संस्थांनी ‘Sir H.N. Hospital Trust’ पेशंट आयडी – 10137246 या नावाने धनादेश द्यावेत अशी विनंती राजेश म्हादलेकर यांनी केली आहे. तसेच अधिक माहितीस म्हादलेकर यांच्याशी 9773684839 / 9892332555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
म्हादलेकर यांना थेट मदत करण्यासाठी त्यांचे बँक खात्याचा तपशील
Rajesh Subhash Mhadlekar
Bank of Maharashtra
Account No. 60005999349
IFSC Code – MAHB0001178
01178 Shree krishna nagar Shantivan borivali (East) Mumbai-400066
MICR no – 400014067






















































