पुण्याच्या संदीप रानडे या तरुणाने दिग्गज टेक कंपनी ‘अॅप्पल’चा ‘बेस्ट डिजाईन अॅवॉर्ड’ पटकावला आहे. कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर संमेलनात याची घोषणा करण्यात आली आहे. संदीपच्या ‘नादसाधना’ या अॅपची अॅपल डिजाईन अॅवॉर्डच्या इनोव्हेशन पॅटेगरीत निवड झाली आहे.
दरवर्षी अॅप्पल कंपनी डिजाईन अॅवॉर्डचे आयोजन करते. त्यानुसार नुकताच सहा विभागांत 12 जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात पुण्यातील संदीप रानडे याचादेखील समावेश आहे. हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीतासाठी त्याने हे अॅप बनवले आहे. हळूहळू त्यात त्याने नवनवीन फिचर्स जोडले. सध्या अॅपमध्ये हिंदुस्थानी क्लसिकल, सेमी क्लासिकल, डिवोशनल लाईट, बॉलिवूड, कारनेटिंग, वेस्टन आणि फ्युजन असे सात प्रकारचे म्यूझिक सपोर्ट आहेत. अॅप वापरताना युजर्सला शानदार अनुभव येतो. यात पॉवरफूल फिचर्सचा सपोर्ट मिळतो. संदीप हा गायक आणि कंपोजर असून पद्मविभूषण पंडित जसराज यांचा तो शिष्य आहे.





























































