
Apple ने आपले पहिले स्मार्ट स्पीकर होमपॉड कायमचे बंद केले आहे. हे होमपॉड Siri व्हॉईसला स्पोर्ट करत होते. कंपनीने 2018 मध्ये हे स्पीकर लॉन्च केले होते. या स्पीकरचे उत्पादन जरी बंद झाले असले तरी, बाजारात उपलब्ध असलेल्या Apple HomePod ची विक्री अजूनही सुरु आहे. यासह, सध्याच्या होमपॉड ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट आणि Apple केअर सर्व्हिस सुरुच राहणार आहे.
हिंदुस्थानात Apple Homepod Smart Speaker ची किंमत 19,900 रुपये इतकी आहे. तसेच यात हाय ऑडिओ साउंडही देण्यात आला आहे. या स्पीकरवर वापरकर्ते अॅपल म्युझिकवर 6 कोटी गाणी ऐकू शकतात.
Apple Homepod ची जागा घेणार आता हे स्पीकर
या फुल्ल साईज स्पीकरची जागा आता होमपॉड मिनी घेणार आहे. कंपनीने सांगितलं की, आता ते होमपॉड मिनीवर लक्ष केंद्रित करणार आहे. बाजारातही होमपॉड मिनीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच ओरिजनल होमपॉडचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.





























































