
अमेरिकेत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसत आहे. दरम्यान Apple ने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त दोन दिवस कार्यालयात हजेरी लावण्याचा नियम कायम ठेवत बाकी दिवस वर्क फ्रॉम होमला परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोज कार्यालयात बोलवण्याचे धोरण कंपनीने गुडाळले आहे.
‘द व्हर्ज’च्या म्हणण्यानुसार, टेक जायंटने कामगारांना अंतर्गत मेमोमध्ये सांगितले आहे की, ‘आम्ही पायलट फेज-इन कालावधी वाढवत आहोत आणि सध्या कार्यालयातील हजेरी आठवड्यातून दोन दिवस ठेवत आहोत.’
जे सध्याचे दोन-दिवस-दर-आठवड्यातील पायलटमध्ये आहेत त्यांना कामावर येण्यास अस्वस्थ वाटत असल्यास त्यांना पुन्हा एकदा दूरस्थपणे काम करण्याचा पर्याय असेल.
अॅपलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मास्क घालण्यास सांगितले आहे.
ऍपलने मेमोमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही कर्मचाऱ्यांना मीटिंग रूम, हॉल आणि लिफ्टमध्ये मास्क घालण्यास सांगितले आहे. वैयक्तीक कामाच्या ठिकाणाशिवाय सर्व ठिकाणी मास्क बंधनकारक केला आहे.’
‘तुमच्यापैकी जे यामध्ये सहभागी होत असतील, जर तुम्हाला या वेळेत ऑफिसमध्ये येण्यास त्रास होत असेल, तर तुमच्याकडे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा पर्याय आहे. कृपया तुमच्या मॅनेजरशी यासंदर्भात चर्चा करा,’ असेही कंपनीने म्हटले आहे.
ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी जवळपास वर्षभरापूर्वी कामाच्या नवीन हायब्रिड मोडची घोषणा केली होती.
याआधी कुक म्हणाले होते की बहुतेक कर्मचाऱ्यांना सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी कार्यालयात येण्यास सांगितले जाईल, बुधवार आणि शुक्रवारी वर्क फ्रॉम होम काम करण्याचा पर्याय असेल.
Apple कर्मचार्यांना वर्षात दोन आठवड्यांपर्यंत WFH करण्याची संधी असते, ‘कुटुंबाला वेळ देणे, एखाद्या ठिकाणाला भेट देणे, प्रवासाची तयारी करणे, अशा प्रकारची वेगवेगळी कारणे’ यामागे असल्याचे सांगण्यात आले.
ताज्या मेमोमध्ये, Apple ने म्हटले: ‘हे बदल तुमच्यासाठी आहेत आणि आम्ही आवश्यकतेनुसार बदल करू.’
संपूर्ण यूएसमध्ये कोविड संक्रमण वाढतच आहे आणि नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून ते सर्वोच्च पातळीवर आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार न्यूयॉर्क शहराची हाय कोविड अलर्टच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.




























































