पुढील वर्षी लॉन्च होणार सर्वात स्वस्त iPhone, वाचा सविस्तर…

673

श्रीमंतांचा फोन म्हणून iPhone कडे पाहिले जाते होते. परंतु गेल्या काही वर्षात iPhone च्या किंमती झपाट्याने कमी झाल्या, तरीही बऱ्याच लोकांच्या आवाक्याबाहेर हा फोन होता. परंतु आता चिंता करू नका कारण अॅपल (Apple) कंपनी लवकरच सर्वात स्वस्त iPhone लॉन्च करणार आहे. पुढील वर्षी पहिल्या सहा महिन्यात iPhone सीरिजमझील सर्वात स्वस्त फोन लॉन्च केला जाणार आहे.

iPhone 11 सीरीज लॉन्च झाल्यानंतर iPhone SE 2 कधी लॉन्च केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला मार्च महिन्यात कंपनी iPhone SE 2 लॉन्च करण्याची शक्यता आहे. iPhone SE ही कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता आणि आता त्याच सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन कंपनी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

iphone

Apple चे पॉप्युलर अॅनालिस्ट मिग ची कुओ (Ming Chi Kuo) याबाबत माहिती देताना म्हणाले की, 2020 च्या पहिल्या तीन महिन्यात iPhone SE 2 लॉन्च करण्यात येईल आणि याची किंमत 399 डॉलर (जवळपास 28,398 रुपये) असणार आहे. यासह iPhone 8 च्या किंमतीही कमी करून त्या 449 डॉलरपर्यंत आणण्यात आल्या आहेत.

iPhone SE 2 लॉन्च झाल्यानंतर iPhone 8 चे उत्पादन थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. कारण iPhone SE 2 चे डिझाईन आणि फिचर्स iPhone 8 प्रमाणेच असणार आहेत. यात फक्त फेसआयडी नसणार, त्याऐवजी टच आयडी देण्यात येणार आहे. याचा डिस्पे 4.7 इंचांचा असण्याची शक्यता आहे. 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध असतील.

आपली प्रतिक्रिया द्या