अॅपलने आयफोन 16 सीरीज नुकतीच लाँच केली आहे. नवीन आयफोन खरेदीसाठी मुंबई, दिल्लीत ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आयफोनसाठी लोक तासनतास रांगेत उभे होते. यामुळे आता अॅपल कंपनीने नवीन चार स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरू या चार ठिकाणी अॅपल स्टोअर ओपन करणार असल्याची घोषणा केली आहे. देशात आयफोन यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, देशात केवळ मुंबई आणि दिल्ली अशा दोन ठिकाणी अॅपलचे स्टोअर आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत अॅपल स्टोअरची संख्या 271, चीनमध्ये 47, यूकेमध्ये 40 संख्या आहे.