उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे 99’ 23 मे रोजी होणार प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे 99’ या आगामी चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आली आहे. हा चित्रपट येत्या 23 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन, दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे.

आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात सुट्ट्यांचा आनंद फक्त स्क्रीनपुरता मर्यादित राहिला आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा ना स्मार्टफोन्स होते, ना वायफाय आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद मिळायचा गावाला जाऊन मोकळ्या हवेत फिरण्यात, नदी-समुद्रावर फेरफटका मारण्यात, सायकलवर भटकंती करण्यात, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपण्यात आणि बर्फाचे गोळे खात मजा लुटण्यात! अशी ‘त्या’ वेळची उन्हाळ्यातील सुट्ट्यांची सफर हा चित्रपट घडवणार आहे.

यात कृष्णा, सिद्धेश, प्रसाद व जाई यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची कहाणी पाहायला मिळणार आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच आपल्या सुट्ट्यांची आठवण करून देईल. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगरप्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगिज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे 99’ बघण्यासाठी सज्ज व्हा.