आयुक्त-मनसे कार्यकर्त्यांत पुणे पालिकेत खडाजंगी, कार्यालयाबाहेर 3 तास ठिय्या आंदोलन

पुणे महापालिकेच्या मुख्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मनेसेचे माजी नगरसेवक अॅड.किशोर शिंदे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यात खडाजंगी झाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर मनसेचे अॅड.शिंदे आणि कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या अंगावर धाऊन गेल्याने महापालिकेत गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात तुम्ही मराठी संस्कृती बदनाम करणारे गुंड असल्याच्या आयुक्तांच्या वक्तव्यामुळे मनसेच्या पदाधिकारी, नेत्यांनी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. पालिकेत मनसे कार्यकर्ते येऊ लागल्याने पाचनंतर पालिकेची दारे बंद करून घेतली. रात्री उशिरा मनसेच्या कार्यर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.