
पाकिस्तानची सरकारी मालकीची विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा (पीआयए) लिलाव करण्यात आला. आरिफ हबीब ग्रुपने पीआयएला ४,३२० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पाकिस्तान सरकारने एअरलाइनच्या विक्रीसाठी ३,२०० कोटी अंदाज लावला होता. परंतु त्यांना १,३२० कोटी जास्त मिळाले. एअरलाइनसाठी आरिफ हबीब ग्रुप आणि लकी सिमेंट ग्रुपमध्ये मोठी बोली लावली होती. मात्र सर्वात मोठी बोली लावून आरिफ हबीब ग्रुपने पीआयएला खरेदी केले.
दरम्यान, कर्ज चुकवण्यासाठी या एअरलाइन्सची विक्री करण्यात आली. पाकिस्तानकडे 34 एअरक्राफ्ट आहेत. यामध्ये केवळ 18 विमाने चांगली आहेत, परंतु विमान कंपनीकडे 97 देशांसोबत व्हॅल्युएबल लँडिंग स्लॉट आणि एअर सर्व्हिस एग्रीमेंट आहे.




























































