
गायक अरिजित सिंग लंडनच्या टोटेनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये सादरीकरण करणारा पहिला हिंदुस्थानी गायक बनेल. त्याचा लाईव्ह शो या वर्षी 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबद्दल अरिजित म्हणाला, ‘‘मी फक्त सामान्य माणूस आहे जो गाणी गातो. मला पुन्हा लंडनमध्ये गाण्याची संधी मिळत आहे याचा मला खूप आनंद आहे. जर यामुळे इतिहास घडला तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल.’’ लंडनमधील अरिजितचे चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.