
सामना ऑनलाईन ,बंगळुरू
भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याची हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. हिंदुस्थानचा युवा संघ जुलै ते ऑगस्ट या कालावधीत श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून यादरम्यान दोन चारदिवसीय व पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार आहे. अर्जुन तेंडुलकरची चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी युवा संघात निवड करण्यात आली आहे. अनुज रावतकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच वन डे मालिकेसाठी आर्यन जुयालकडे हिंदुस्थानी युवा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.






























































