अंबड तालुक्यातील मठतांडा येथे सशस्त्र दरोडा; विरोध करणाऱ्यावर चाकूचे वार

316

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

अंबड तालुक्यातील मठ तांडा येथे काल ११ जुलै रोजीच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला असून यामध्ये तीन मोबाईल व बाहेर अंगणात पती- पत्नीr झोपलेल्या पत्नीचे गळ्यातील मंगळसूत्र दरोडेखोर हिसकावत असतांना पतीने दरोडेखोरांनी प्रतिकार केला. त्यामुळे दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने व लोखंडी राँडने हल्ला चढून गंभीररित्या जखमी करून दोन्ही पाये निकामी केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी ११ जुलै रोजी मठतांडा येथे मध्यरात्री प्रथम दरोडेखोरांनी मठ तांडा येथील गुलाब लक्ष्मण जाधव यांच्या घरी चोरी करुन त्यामध्ये चोरट्यांनी गुलाब जाधव व त्यांचा मुलगा विलास गुलाब जाधव यांचे सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल चोरल्यानंतर गावात पाचशे मिटर अंतरावर संजय मुरलीधर राठोड यांच्या पत्नी शांताबाई यांना दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याचा प्रयत्न केला असता संजय राठोड यांनी मंगळसुत्र चोरणाऱ्या एका दरोडेखोरास प्रतिकार करण्यासाठी व त्याला जोरदार मिठ्ठी मारून पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु सोबत असलेल्या तीन दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार चाकुने वार केला. चाकुचा वार त्यांनी हातावर झेलल्यानंतर त्यांनी पायावर वार केले.

एवढ्यावरच दरोडेखोरांनी न थांबता त्यांनी लोखंडी रॉडने संजय राठोड यांच्या दोन्ही पायावर हल्ला चढवून त्यांचे दोन्ही पाय निकामी केले आहेत. हल्ल्याचा आवाज ऐकून संजय राठोड यांचे घरात झोपलेले दोन्ही मुलांनी आरडाओरडा सुरू केल्याने तेथून दरोडेखोरांनी पळ आणि सुदैवाने संजय राठोड यांचा प्राण वाचला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जालना येथील संजिवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी शेवगन तसेच गोंदी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच जालना येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांस पाचारण केले असता श्वान दोदडगाव शिवारातील अरुण रत्नपारखे यांच्या शेततळयाजवळ आले. श्वान शहापूर ते बारसवाडा अर्धा रस्त्यावर घुटमळले. त्यावरून दरोडेखोरांनी पुढे वाहनांनी पळ काढला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. सदर घटनेमुळे मठ तांडा परिसरात ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनेला आळा बसवावे, अशी मागणी होत आहे.

मोबाईलच्या लोकशेनवरुन तपास सुरू
पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगण मठतांडा येथील चोरी गेलेल्या मोबाईलवरुन दरोडेखोरांचा माग लागला असून आमची पूर्ण टीम दरोडेखोरांच्या मागावर असून लवकरच जेरबंद करणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या