नाशिकमध्ये भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न; गोळीबारात एकाचा मृत्यू, तीन जखमी

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील सिटी सेंटरमॉल जवळच्या मुथुट फायनान्सच्या कार्यालयावर भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी कार्यालय बंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर सात-आठ जण यावेळी कार्यालयात उपस्थित होते. चार दरोडेखोर यावेळी कार्यालयात घुसले आणि त्यांनी दमदाटी केली. यावेळी ऑडिटरने सायरन दाबला. त्यानंतर दरोडेखोर बिथरले. त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर झटपट झाल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात संजू सॅमसन यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, नाशिककरांनी संताप व्यक्त केला असून अशा घटनांना रोखण्यात पोलीस कमी पडत असल्याचे म्हटले आहे.