
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी रविवारी जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले. या दौऱयात त्यांनी सुभेदार परवेझ यांची भेट घेतली. लष्करप्रमुखांनी कार थांबवली आणि घरात जाऊन सुभेदार परवेझ (निवृत्त) यांची गळाभेट घेतली. ही ग्रेट भेट चर्चेत आली आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि कश्मीरमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी पूंछ जिल्ह्यातील काही विभागांना भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. तसेच त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला. त्यांनी सैन्याच्या उच्च मनोबल आणि ऑपरेशनल तयारीचे काwतुक केले. या भेटीदरम्यान, लष्करप्रमुख पूंछमधील कामसर गावात थांबले. तिथे त्यांनी 18 जम्मू आणि कश्मीर रायफल्सचे सुभेदार (मानद पॅप्टन) परवेझ अहमद (निवृत्त) यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांशी संवाद साधला.
2002 ते 2005 दरम्यान सुभेदार परवेझ अहमद हे लष्करप्रमुख द्विवेदी यांच्या युनिटमध्ये तैनात होते. जनरल उपेंद्र द्विवेदी या बटालियनचे नेतृत्व करत होते. सुभेदार परवेझ अहमद मार्च 1991 मध्ये सैन्यात सामील झाले आणि 25 वर्षांच्या सेवेनंतर मार्च 2019 मध्ये निवृत्त झाले. निवृत्त लष्करी कर्मचाऱयांनी ऑपरेशन सिंदूरमध्येही भूमिका बजावली.
‘वेटरन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मान
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान परवेझ यांचे सततचे योगदान आणि पाठिंबा याबद्दल लष्करप्रमुखांनी त्यांना ‘वेटरन अचिव्हर’ पुरस्कार प्रदान केला. यावेळी परवेझ यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी सैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. लष्करप्रमुखांच्या भेटीदरम्यान, महिला आणि मुलांसह या भागातील अनेक माजी सैनिक आणि नागरिकांनीही लष्करप्रमुखांची भेट घेतली. ही अनौपचारिक भेट जम्मू आणि कश्मीरच्या सीमावर्ती जिह्यांमधील सेवारत कर्मचारी, माजी सैनिक आणि नागरिक यांच्या स्नेहपूर्ण संबंधांचे प्रतीक ठरली.



























































