सांगलीच्या लष्करी जवानाची संभाजीनगरात रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या

2061

छावणी येथील नगर रोडवर असलेल्या रेल्वे उड्डाण पूल येथे एका 38 वर्षीय लष्करी जवानाने रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली. दैवत साळुंके असे या जवानाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

संभाजीनगर- नगर महामार्गावर असलेल्या छावणी परिषदेच्या हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दैवत साळुंके या जवानाने उडी मारून आत्महत्या केली. हा जवान 159 मेड रेजिमेंट संभाजीनगर कॅम्पचा हवलदार होता. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच सदरील जवान हा लष्कराचा असल्यामुळे लष्कराचे अधिकारी व लष्करातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ही आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र रेल्वेच्या धडकेने जवानाच्या शरीराचे तुकडे झाले होते. सदरील जवानाने गणवेशात आत्महत्या केल्याची समोर आले असून तो सांगली जिल्ह्याचा असल्याची माहिती लष्करातील अधिकाऱ्याने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या