
राजधानी दिल्लीत मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत ऑपरेशन सिंदूर व ऑपरेशन महादेव यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. ’ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला.
’ऑपरेशन सिंदूर’ला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता. सैन्याने आपली कामगिरी चोख बजावली. मात्र, सरकारने ऐनवेळी कारवाई थांबवली. या कारवाईत हिंदुस्थानची किती विमाने पडली याचे उत्तरही सरकारने दिलेले नाही. इतर प्रश्नही अनुत्तरीत आहेत. असे असताना, भाजपकडून या कारवाईच्या यशाचे श्रेय घेतले जात असून सत्कार सोहळे होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.