Video – अर्णब गोस्वामी व्हॉट्सॲप चॅट लीक; वरिष्ठ पोलिसांची चर्चा करून कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सॲप चॅटचे प्रकरण आता अधिकच तापणार असल्याचं दिसत आहे. या कथित संवादातून अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत की, ‘अर्णब गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणातून देशाच्या सुरक्षिततेशी सबंधित अत्यंत संवेदनशील माहिती समोर आल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मला निवेदन देऊन तक्रार केली आहे.

या संभाषणात पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईक होण्याअगोदरच सर्व गोपनीय माहिती अर्णबला माहित झाल्याचे स्पष्ट होत असल्याने याप्रकरणी आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून राज्यसरकार पुढील कायदेशीर कारवाई करेल,’ असे ते म्हणाले आहेत.