अर्शद वारसी करणार वेबसीरिजमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या अप्रतिम अभिनयाने रुपेरी पडद्यासोबतच छोटा पडदा गाजवल्यानंतर अर्शद वारसी आता वूट ओरिजिनल्सच्या असूरा या वेब सीरिजमधून डिजिटल जगात पदार्पण करणार आहे.

या सायकॉलॉजिकल थ्रीलरमध्ये अर्शद डॉ. धनंजय ही चलाख आणि काहीशी विक्षिप्त अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे. पडद्यावर विनोदाचे उत्तम टायमिंग साधत या कलाकाराने आपले एक अढळ स्थान निर्माण केले. आता त्याला या वेगळ्या, नाट्यमय रुपात पाहताना त्याचे चाहते नक्कीच स्तिमित होतील. हा प्रतिभावान अभिनेता म्हणाला, “मी साकारतोय तो धनजंय अतिशय वेगळी भूमिका आहे. समंजसपणा, हुशारी आणि अनुभवामुळे तो जे काही करतो ते उत्कृष्टच करतो. तो परफेक्शनिस्ट आहे.”

आपल्या व्यक्तिरेखेशी एकरूप होण्याची सर्व काळजी या अष्टपैलू अभिनेत्याने घेतली आहे. तो म्हणाला, “तयारी करताना कार्यक्रमाच्या दिग्दर्शकासोबत व्यक्तिरेखा समजून घेणे, हा मोठा भाग होता. त्यांच्यासोबत बराच काळ चर्चा केल्यानंतर प्रत्येक दृश्यातून दिसणाऱ्या फ्रेममधून त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, हे मला समजू शकले. या कार्यक्रमाची टीम भन्नाट आहे आणि ‘असूरा’चा भाग असणे हे खरंच खूप छान आहे.”