
>> डॉ. अनुराधा कुलकर्णी
मराठेकालीन स्त्र्ााrजीवन हे मध्ययुगीन रूढी व परंपरेप्रमाणेच देवावर श्रद्धा असणारे नवससायास करणारे, पूजेअर्चेत रमणारे असे धार्मिक आणि पाप-पुण्य, स्वर्ग-नरक अशा कल्पनांवर विश्वास ठेवणारे असे धर्मभिरू-पापभिरू होते. पुण्यप्राप्तीच्या तीर्थाटनच्या उद्देशाने तीर्थाटन, मुख्यतः काशीयात्रा करणाऱया स्त्र्ायांची उदाहरणे कागदपत्रातून येतात. काशीयात्रा केल्यामुळे जे पुण्य मिळे त्याची महत्ता किती होती हे ‘लेखनप्रशस्ती’ या पुस्तकातील एका खरेदीपत्रातून आपल्यासमोर येते. या खरेदीपत्राचे कारण फारच हृद्य आहे. खरेदीपत्र वाईला कृष्णानदीच्या तीरावर श्रीकृष्णेला साक्ष ठेवूनच केले आहे.
वाईच्या भिऊबाई देशपांडे यांचा मुलगा राघो महादेव हा दोन वर्षांचा असताना देवीच्या रोगामुळे त्याचे डोळे गेले. दोन्ही हातही लुळे झाले. आपल्या या अंध व लुळय़ा मुलाला कोणी मुलगी देणार नाही ही खंत भिऊबाईंना होती. या अंध व लुळय़ा मुलाने व आपणही काशीयात्रेचे पुण्य संपादन करावे हा हेतू मनी धरून भिऊबाई राघोला घेऊन वाईहून काशीयात्रेला गेल्या. बरोबर वाईचे लोकही असावेत.
वाई ते वाराणसी हा प्रवास सुखरूप पार पडला. देवदर्शन झाले. यात्रा संपत आली आणि त्याच्या लक्षात आले की, आपल्या परतीच्या प्रवासाचे पैसे संपले आहेत. आता वाईला परत जाणार कसे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहीला. कर्मधर्मसंबंधाने वाराणसीत आणाभट काशीकर या सद्गृहस्थांनी भिऊबाईंची ही अडचण समजून घेऊन त्यांना वाटपरतीसाठी दीडशे रुपये कर्जाऊ देण्याचे कबूल केले, पण या रकमेसाठी तारण मागितले.
परमुलखात भिऊबाई व अंध-लुळय़ा राघोपुढे मोठा गहन प्रश्न उभा राहिला की, आपण या कर्जासाठी तारण पिंवा गहाण काय ठेवणार? जवळचे तर सगळे संपलेलेच होते. तेव्हा या धर्मभिरू-पापभिरू, देवभक्त मायलेकरांनी आपले काशीयात्रा केल्याचे पुण्यच काशीकराकडे तारण म्हणून ठेवायचे ठरवले. विशेष म्हणजे आणाभट काशीकरही या काशीयात्रेचे पुण्य तारण म्हणून घेण्यास तयार झाले आणि भिऊबाई देशपांडे यांना कर्जाऊ म्हणून दीडशे रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले. ‘‘आम्ही तुमचे पैसे व्याजसुद्धा वाईस गेल्यावर परत करू. यासाठी आमची काशीयात्रा तुमच्याकडे गहाण आहे’’ असा कबूलफतवा वाराणसीत भिऊबाईंकडून काशीकरांनी लिहून घेतला व त्यांना दीडशे रुपये दिले.
यात्रा संपवून सर्वजण वाईस परत आले, परंतु अवर्षण व इतर काही कारणास्तव भिऊबाईंना काशीकरांचे पैसे पाठवायला विलंब झाला. वाट पाहून आपल्या कर्जाऊ रकमेसाठी आणाभट काशीकर वाईला आले व आणाशपथा घालून पैशाचा तगादा करू लागले. आपण रकम परत करू शकलो नाही ही टोचणी मायलेकरांनापण लागली होतीच. काही दुःचिन्हेपण होऊ लागली. मग भिऊबाईंनी विचार केला की ‘‘आपण काशीयात्रा केली ती यात्रा काशीकराजवळ गहाण ठेवली. काशीकराचे रुपये दिले नाहीत तर रुपयांसाठी यात्रा त्याची झाली त्याला दिली असे होत आहे. यात्रा केली हे आपण पुण्याचे साधन केले आणि यात्रा रुपयांकरिता दिली म्हणजे नरकाचे साधन होते.’’ तेव्हा हे कर्ज काहीही करून फेडायलाच हवे.
यावर उपाय म्हणून भिऊबाईंनी आपल्या देशपांडेपणाच्या वतनाची वाटणी आपल्याच भावकीतील हरी मोरेश्वर देशपांडे यांना विकत दिली. आलेल्या पैशातून दीडशे रुपये व्याजसुद्धा आणाभट काशीकर याला परत दिले, हे खरेदी-विक्री पत्र वाईला कृष्णा नदीच्या तीरावर श्री काशी विश्वनाथ व श्रीकृष्णेला साक्ष ठेवूनच करण्यात आले व भिऊबाईंनी कर्जमुक्त होऊन आपले काशीयात्रेचे गहाण पुण्य सोडवून घेतले. इ. स. 1737 सालचे मराठेकालीन स्त्र्ााrजीवनाचेच काय, पण एकूण मराठेकालीन धर्मभिरू समाजरचनेचेच हे एक हृदयस्पर्शी उदाहरण आहे. कर्जासाठी तारण म्हणून काशीयात्रेचे गहाण ठेवलेले पुण्य सोडवण्यासाठी आपले वतन विकणाऱया भिऊबाई देशपांडे आणि काशीयात्रेचे पुण्य तारण म्हणून लिहून घेऊन कर्ज देणारे वाराणसीचे आणाभट काशीकर हे तत्कालीन धर्मभिऊ-पापभिरू समाजरचनेचे एक हृद्य उदाहरण आहे.
कर्जासाठी तारण म्हणून काशीयात्रेचे गहाण ठेवलेले पुण्य सोडवण्यासाठी आपले वतन विकणाऱया भिऊबाई देशपांडे आणि काशीयात्रेचे पुण्य तारण म्हणून लिहून घेऊन कर्ज देणारे वाराणसीचे आणाभट काशीकर हे तत्कालीन धर्मभिऊ-पापभिरू समाजरचनेचे एक हृद्य उदाहरण आहे.
(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत)
n [email protected]





























































