दखल – प्रेमाचा ‘व्हॉट्सऍप’ प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अस्मिता प्रदीप येंडे

मानवाला अनेक भावना, संवेदना देवाने दिलेल्या आहेत. त्यातलीच एक भावना म्हणजे प्रेम… प्रेम ही जगातील सगळ्यात सुंदर अशी भावना आहे आणि प्रत्येकाला प्रेमाची ओढ़ असतेच… प्रत्येक नात्यातले प्रेम हे वेगवेगळे असते… आई-मुलींमधील, बाबा-मुलांमधील तसेच भाऊ-बहिणीमधील तसेच प्रियकर आणि प्रेयसीमधील प्रेम… प्रेम ही संकल्पना अनेक चित्रपटांच्या माध्यमातूनही माहीत होत गेली. पूर्वी पत्रलेखनाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त व्हायचं. एकमेकांना हळूच बघणं, लाजणं, शब्दांतून आपलं प्रेम व्यक्त करणं… त्यात खरेच गंमत असायची. तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते पण मनं जोडली जायची.

हळूहळू तंत्रज्ञान विकसित झाले आणि व्यक्त होण्याची भावना बदलली. मोबाईल पह्न आल्यानंतर क्रांती झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्या भावना मांडू लागले. जवळजवळ सगळेच प्रेम व्यक्त करण्यासाठी या सोशल मीडियाचा आधार घेऊ लागले. पूर्वीचं प्रेम आणि आताचं प्रेम यात तफावत जाणवते. हल्ली व्हॉट्सअॅपवर विचारणं, लाँग ड्राइव्हला जाणं, महागडय़ा होटेलमध्ये डेटवर जाणे, व्हॅलेंटाईन डे साजरे करणे , एकमेकांना भेटवस्तू देणे या आभासी जगात हल्लीची पिढ़ी वावरताना दिसते. खऱया प्रेमाची अनुभूती काय असते यापासून नवी पिढ़ी अनभिज्ञ आहे.

आजवर आपण रोमियो-ज्युलियेट, हीर-रांझा, शिरीन- फरहाद, राज-सिमरन अशा अनेक प्रेमकथा ऐकल्या-पाहिल्या असतील. अनेक प्रेमकहाण्या वाचल्या असतील. अशीच एक प्रेमकहाणी कादंबरीच्या स्वरुपात वाचकांच्या भेटीस आली आहे. लेखक सुनील पांडे लिखित ‘इंद्रायणी एक्सप्रेस’ ही व्हॉट्सअॅप कादंबरी (महाकादंबरी). सोशल मीडियातील प्रभावी माध्यम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्यक्त होणारी सुरेख अशी कादंबरी… पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. तब्बल 518 पानांची ही कादंबरी वाचकांना हळूहळू कथानकात गुंतवून ठेवते आणि पुढे काय, अशी उत्सुकता निर्माण होत राहते. पूर्ण कादंबरी वाचल्याशिवाय खाली ठेवाविशी वाटत नाही, हे श्रेय लेखक सुनील पांडे यांचे आहे.

‘इंद्रायणी एक्सप्रेस’ कादंबरी वर्तमानातून भुतकाळात असा प्रवास करत पुढे जाते. सुशील हा कादंबरीचा नायक आहे. तो कवीमनाचा संवेदनशील माणूस. मनीषा ही कादंबरीची नायिका… सुशील हा मनीषाला लाड़ाने मनू म्हणतो. सुशील आणि मनीषा यांची व्हॉट्सअॅप गप्पागोष्टीतून उलगडत जाणारी निरागस, प्रेमळ अशी गोष्ट मनाचा ठाव घेते. मैत्री ते प्रेमाचा हा प्रवास नेमका कसा पार होतो, सुशील आपल्या मनातील प्रेम व्यक्त करतो का? आणि समजा प्रेम व्यक्त केले असेल तर मनीषा त्याला कसा प्रतिसाद देते? हे सगळे प्रश्न कादंबरी वाचताना मनात निर्माण होतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ‘इंद्रायणी एक्सप्रेस’मध्ये दड़लेली आहेत. कादंबरीचे निवेदन प्रथम पुरुषी आहे. कादंबरीचा नायक कथानक निवेदन करत गोष्ट पुढे नेतो. स्त्राr आणि पुरुष यांच्या मैत्रीकड़े समाजाची बघण्याची दृष्टी तसेच आपल्या समाज व्यवस्थेवर असणारा रुढ़ी-परंपररांचा प्रभाव हा महत्त्वाचा दृष्टिकोनसुद्धा लेखकाने यात अधोरेखित केला आहे.
कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे कादंबरीचा आपृतीबंध. आताच्या जीवनसरणीला साजेशी अशी रचना आहे. व्हॉट्सअॅपवर ज्या पद्धतीने आपण संदेश पाठवतो आणि आपल्याला त्याचे प्रतिउत्तर येते त्या स्वरुपात ही कादंबरी आपल्या जीवनात झालेल्या बदलांचे एक चित्र उभे करते. सोशल मीडियाच्या आपल्यावर असणाऱया प्रभावाच्या माध्यमातून आपली कादंबरी वाचकांसमोर आणण्याची लेखकाची कल्पना वाखाणण्याजोगी आहे. एकमेकांना संदेश पाठवण्याच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून कथानक फुलत जातं. या आपृतीबंधामुळे नवीन पिढ़ीतील रसिक वाचकसुद्धा कादंबरीकड़े आकर्षित होतील.

लेखक सुनील पांडे यांनी ही कादंबरी कादंबरीच्या नायिकेला म्हणजेच मनूला अर्पण केली आहे. पुस्तकाची रचना, आपृतीबंध, बांधणी उत्तम आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी समर्पक रेखाटले आहे. डॉ. स्नेहलता तावरे यांनी कादंबरीची साजेशी पाठराखण लिहिली आहे. मनापासून मनापर्यंत सुरू झालेली निरागस, तरल, निःस्वार्थी अशी ही कहाणी मनाला नक्की भावेल आणि वाचक कादंबरीच्या प्रेमात पडतील!

इंद्रायणी एक्सप्रेस
लेखक- सुनील पांडे
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
मूल्य – रुपये 700/-