गुंतवणुकीतील खेळाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आजच्या लेखात गुंतवणुकीचे विविध प्रकार कुठले आहेत व आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्यांचे नेमके काय स्थान आहे हे पाहणार आहोत.

गुंतवणुकीकडे फुटबॉलचा सामना म्हणून बघू या. गुंतवणूक प्रकारात आपल्या गोलची रक्षा करणारा टर्म इन्शुरन्स व हेल्थ इन्शुरन्स व फायर इन्शुरन्स आपल्या संघात असायलाच हवा. पुरेशी मेडिक्लेम बेस पॉलिसी व टॉप अप पॉलिसी असायलाच हवी.

बचाव फळीतील आपले खेळाडू म्हणजे बँक, पोस्ट, म्युच्युअल फंडातील डेट तसेच बचतीच्या विमा पॉलिसी. यांचे काम म्हणजे गरजेला निधी मिळवून देणे. या गुंतवणुका आपल्या पोर्टपहलिओमध्ये असल्यामुळेच शेअर मार्पेट जेव्हा पडलेले असते तेव्हा तेथील गुंतवणुकीतून पैसे न काढता संयम ठेवण्याची क्षमता निर्माण होते व भविष्यात शेअर मार्पेटमधून जास्त परतावा मिळण्याच्या संधी निर्माण होतात. यापुढचा कमी आक्रमक असलेला खेळाडू म्हणजे बॅलन्स फंड. जोखीम व सुरक्षितता जपणारा हा खेळाडू सुरक्षित गुंतवणुकांपेक्षा जास्त परतावा देतो, पण यामध्ये जोखीम असतेच.
आपल्याला संपत्ती निर्माण करायची तर आक्रमक खेळाडूंवर भिस्त ही हवीच. हेच खेळाडू 12 टक्के ते पुढे परतावा देण्याची क्षमता ठेवतात. यामध्ये शेअर मार्पेट, प्रॉपर्टी, कलाकृती, अल्टर्नेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड आदी गुंतवणुकाRचा समावेश होतो.

या सर्व गुंतवणूक प्रकारात जास्त जोखीम आहेच. आपल्या संघात एखादा स्टायकर खेळाडू असतोच. तो पुढे पुढे जात असल्याने फाऊल होण्याच्या शक्यताही अधिक. फ्युचर, ऑप्शन, क्रिप्टो करन्सी यापैकी गुंतवणूक अगदी थोडी करावी. कारण यामध्ये खूप जास्त परतावा अगदी शेअर मार्पेटपेक्षा जास्त आणि मुद्दल गमावण्याच्या शक्यताही त्याहून अधिक. त्यामुळे जेवढे विसरता येईल तेवढीच गुंतवणूक करणे योग्य. अशा प्रकारे सर्व प्रकारचे खेळाडू घेऊन टीम बनविली तर आयुष्याच्या ग्राउंडवर नक्कीच जिंकता येईल. हा सांघिक विजय आहे.

[email protected]