
>> दीपा देशमुख
तुषार कुलकर्णी हा ठाण्याचा वाणिज्य शाखेचा पदवीधारक. लौकिकार्थाने तो ना प्राणिशास्त्रज्ञ आहे ना त्याच्याकडे प्राणिशास्त्रविषयक कुठली अधिकृत पदवी आहे; मात्र प्राणिविश्वात काम करणे आणि त्यांचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे या एकाच वेडाने तो प्रचंड झपाटला. त्या वेडानेच त्याला जिराफ मित्र आणि संशोधकही बनवले आहे. त्याच्या या संपूर्ण प्रवासाची ही कहाणी…
तुषार कुलकर्णी… जिराफ मित्र आणि प्राणिसंरक्षक अशी त्याची आता जगभरात ओळख झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, त्याचा वाणिज्य शाखेचा पदवीधर ते प्राणिमित्र असा प्रवास होईल. 10 वर्षे नोकरी केल्यावर त्याने प्राणिशास्त्रात पूर्णवेळ ‘करीअर’ करण्याचे ठरवले. नोकरी सोडली आणि देश-विदेशातील वेगवेगळय़ा प्राणिसंग्रहालयांमध्ये जाऊन प्राण्यांविषयी अभ्यास, संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यातही जिराफ हा त्याचा विशेष ‘जिव्हाळ्या’चा प्राणी असल्याने तुषारने त्याच्याच संशोधनावर लक्ष केंद्रित केले आणि मुंबईतील गोरेगावच्या बीएनएचएस कॉन्झर्व्हेशन एज्युकेशन सेंटर ते अमेरिकेच्या इंडियाना प्रांतातील फोर्ट वेन बाल प्राणिसंग्रहालय युगांडा वाइल्ड लाइफ एज्युकेशन सेंटर या त्याच्या थरारक जीवनप्रवासाबद्दल तो भरभरून बोलतो. मुळात तुषारला नॅशनल जिओग्राफी ही वाहिनी बघण्याचे प्रचंड वेड होते. त्याच्या आजच्या व्यावसायिक उद्दिष्टाचे मूळ त्याच वेडात आहे. शिकागो इथं भरलेल्या इंटरनॅशनल परिषदेमध्ये जिराफांकरच्या कर्तनाकरचा त्याचा पेपर प्रसिद्ध झाला. तसंच उत्तर युगांडामध्ये जिराफांच्या सर्केक्षणात त्यानं सहभाग घेतला. तुषार हा 2011 साली युगांडामध्ये गेला आणि तिथे त्याला जिराफ भेटला. जिराफांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. जिराफ हा शब्द अरेबिक शब्द आहेत. जराफा याचा अर्थ जोरात चालणारा असा आहे. पूर्की रोमन्स आणि ग्रीक्स यांना या प्राण्याला काय म्हणायचं हे त्यांना कळायचं नाही. त्यामुळे त्यांना हा उंट आणि लेपर्ड असं कॉम्बिनेशन त्यांना काटायचं. जिराफांचा रोजचा दिनक्रम न्याहाळणं, त्यांचं आरोग्य, खाणं बघणं हे सगळं तुषार त्यावेळी करायचा. त्यांचं खाणं डोक्याच्या स्तराकर ठेकलं जातं. हिंदुस्थानात परत आल्याकर या 18 फूट उंच ‘उंटा’ला जकळून बघताना आणि त्याच्याबरोबर काम करताना तुषारला त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. त्यानंतर तुषार जिराफासाठी पूर्णपणे झपाटला गेला. जगामध्ये जिराफ हे फक्त आफ्रिकेच्या जंगलात आहेत. बाकी ठिकाणी ते प्राणिसंग्रहालयात आहेत. आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तुषारनं काम केलं. हिंदुस्थानमध्ये 30 जिराफ आहेत. दहा प्राणिसंग्रहालयामध्ये आणि सर्वात जास्त कोलकात्यामध्ये आहेत. तुषार कोलकात्यामध्ये पोहोचला. प्राणिसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांना तुषारनं जिराफाविषयीची रोचक माहिती थोडक्यात द्यायला सुरुवात केली. याच वेळी तुषारनं जिराफांच्या वर्तनाचा अभ्यास केला. प्राणिसंग्रहालयातल्या जिराफांना सतत भिंती चाटताना त्यानं बघितलं आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, जंगलामध्ये जिराफ त्यांची जीभ झाडावरची पानं तोडण्यासाठी वापरतात. इथं त्यांना ट्रेमध्ये पानं दिली जायची. त्यांना आपल्या जिभेचा वापरच करता यायचा नाही. त्यामुळे त्यांच्यात ऍबनॉर्मल बिहेविअर सुरू झालं होतं. तुषारनं त्यावर अभ्यास करून एक पेपरही लिहिला. हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी त्यानं जिराफाच्या उंचीवर एक मोठी बरणी ठेवून त्याला मोठं छिद्र केलं आणि आत त्याचं अन्नपाला ठेवला. त्यामुळे जिराफाला आपली जिभ वापरून तो आतला पाला मिळवणं सुकर झालं. मात्र त्या बरणीत जीभ घालून ते एक एक पान त्याला मिळवण्यात त्याचे दोन तास जायला लागले. जे जेवण आधी तो पाच मिनिटांत करायचा इथं त्याच्या जिभेला व्यायाम होत ते झाल्यानं त्याच्या भिंती चाटण्याच्या वर्तनात बदल झाला. त्याचा स्ट्रेस कमी झाला.
तुषार अमेरिकेत गेला असताना जिराफ कसा जन्मतो हे प्रत्यक्ष बघितलं. त्याच्यासाठी तो अविस्मरणीय अनुभव होता. जिराफाच्या बाळाला तपासणीसाठी आणलं गेलं तेव्हाचा अनुभवही तुषारला खूप लक्षात राहण्याजोगा होता. जन्माच्या वेळी फिमेल जिराफ तिचा जन्म झाला तिथेच जाऊन आपल्या पिलाला जन्म देतात. ते आपल्या बाळाबद्दल खूप जागरूक असतात. जिराफ माणसाळले जातात. जिराफ गेल्या 30 वर्षांत 40 टक्के कमी झाले आहेत. जगातला मोठा प्राणी धोक्यामध्ये आला आहे. वन्यजीवन एका बाजूला आणि एका बाजूला माणूस असं भयानक चित्र दिसतं आहे. जिराफांचं हिंदुस्थानातलं बारकोडिंग करायचं काम तुषार करतोय. जिराफांच्या जाती कोणत्या आहेत हे बघणं सुरू आहे. 2018 मध्ये तुषार आफ्रिकेत गेला असताना त्यानं तिथल्या 25 जिराफांवर काम केलं. त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेणं, त्यांच्या शरीराची मोजमापं घेणं, सॅटेलाइट कॉलर त्यांच्या शरीरावर बसवणं, ही कामे करताना त्याला खूप आनंद मिळाला. जिराफाला पकडणं हीदेखील खूप नाटय़मय गोष्ट असते हे त्याला समजलं. ‘कुठल्याही प्राण्यांवर अभ्यास करताना आधी व्हॉलेंटियर म्हणून काम करावं. स्वअभ्यास आणि सातत्यानं अभ्यास करणं महत्त्वाचं. इंटरनेटच्या सुविधेनं आपण खूप अभ्यास करू शकतो. आवडत्या कामासाठी जगात कुठेही आपण संपर्क साधू शकतो. प्रयत्न करा आणि संयम बाळगा.’ असं तुषार म्हणतो.तुषारने आपल्याला एक वैश्विक गोष्ट शिककली ती म्हणजे आस्था, सहवेदना. आजच्या माणसांच्या जगात आपण स्वपलीकडे पाहायला विसरलो आहोत. समोरच्या माणसाच्या भावना, विचार संवेदना जाणायला त्यांच्या जागी ठेवणं इतकं जड होत असतानाही हा मात्र प्राण्यांच्या सोबतच असतो. निसर्गानं माणसाला शिकवलेलं मूल्य म्हणजे परस्परावलंबनाचं आहे. आपण आज माणसा माणसांमधलं परस्परावलंबन विसरायला लागलो आहोत. आज या मूल्याचं महत्त्व पुन्हा रुजायला हवं हे तुषारसारख्या अवलियांकडून कळतं.





























































