खोया खोया चांद – व्यवस्थेविरुद्धचा आाक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय कुलकर्णी

सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमाच्या दुनियेत समांतर चित्रपटाने एक कमालीची कलात्मक उंची गाठली होती. सिनेमा या प्रभावी माध्यमातून प्रेक्षकांना हे सिनेमे विचार करायला लावत. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस गोविंद निहलानी यांचा ‘आाक्रोश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्या काळात मोठी खळबळ उडवून दिली होती. वंचित आदिवासी समाजाच्या व्यथा अत्यंत प्रभावीपणे दिग्दर्शकाने यात मांडल्या होत्या. दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा हा पहिलाच चित्रपट होता. ते दिग्दर्शकासोबतच चित्रपटाचे छायाचित्रकारदेखील होते. त्यामुळे कलाकारांच्या भावनांचा आविष्कार त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने टिपला होता. विशेषत ओम पुरी या अभिनेत्याचे क्लोज अप्स, त्याच्या डोळ्यांतील थंडपणा आणि चेहऱयावरील वेदना फार चांगल्या पद्धतीने यात दाखवल्या होत्या.

या चित्रपटासोबत खूप मोठी नावे जोडली गेली होती. या सिनेमाची कथा-पटकथा विजय तेंडुलकर यांची होती, तर चित्रपटाचे संवाद सत्यदेव दुबे यांनी लिहिले होते. चित्रपटात नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘आाक्रोश’ या चित्रपटाला सात फिल्मफेअर पुरस्कार तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट असे मानाचे सर्व पुरस्कार मिळाले.

चित्रपटाचे कथानक सत्तरच्या दशकातील आहे. आदिवासी समाजावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांची होणारी मुस्कटदाबी आणि हे करणारा उच्चवर्गीय समाज, त्यांची मुजोरी व दादागिरी. समाजातील या वर्गाचा भयानक संघर्ष आणि या सर्व प्रकाराची पांढरपेशी समाजाला काहीही न वाटणारी खंत व त्यांचा बेमुर्वतपणा या चित्रपटातून फार प्रभावीपणे दिग्दर्शकाने मांडला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला लहान्या भिकूला (ओम पुरी) कोर्टात आणले जाते. त्यावर त्याची पत्नी नागी (स्मिता पाटील) हिचा खून केल्याचा आरोप असतो. आरोपी लहान्या गरीब असल्यामुळे स्वत:च्या बचावासाठी वकील देऊ शकत नाही. तेव्हा सरकारच्या वतीने कोर्टच त्याला वकील पुरवते. अॅडव्होकेट भास्कर कुलकर्णी (नसिरुद्दीन शहा) हा त्याचा वकील असतो. त्याची ही पहिलीच केस असते. सरकारी वकील अॅडव्होकेट दुसाने (अमरीश पुरी) असतात. खरे तर ते भास्कर कुलकर्णीचे मेंटॉर असतात. संपूर्ण चित्रपटात हा कोर्ट ड्रामा खूप संयतपणे चित्रित केला आहे. भास्कर कुलकर्णी जेव्हा लहान्या भिकूला आपल्या पत्नीच्या खुनाबद्दल विचारतो त्या वेळेला लहान्या काहीच बोलत नाही. गप्प राहतो. तोंडातून चकार शब्द काढत नाही, पण त्याचे हताश डोळे खूप काही सांगत असतात. भास्कर जंगलात जाऊन भिकूच्या झोपडीतील वृद्ध वडील (नाना पळशीकर) आणि तरुण बहिणीला (भाग्यश्री कोटणीस) भेटतो, पण तेदेखील तोंडातून एक शब्द काढत नाहीत.

जंगलात आदिवासींना संघटित करणारा एक सामाजिक कार्यकर्ता (महेश एलकुंचवार) असतो. तो भास्करला सत्य सांगतो. लहान्याने त्याच्या पत्नीचा नागीचा खून केलेला नसतोच, तर गावातील उच्चवर्गीय समाजातील मोठय़ा धेंडांनी तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केलेला असतो. आता भास्करला सत्य समजलेले असते, पण त्याच्याकडे कुठलाही पुरावा नसतो. कोर्टातील सुनावणीच्या वेळेला लहान्या ‘आपल्या पत्नीचा वेश्या म्हणून वापर करायचा’ असा उलटा आरोप त्याच्यावर केला जातो. लहान्या हताशपणे सर्व ऐकून घेत असतो. त्याच काळात लहान्याचे वडील मरण पावतात. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी लहान्याला स्मशानात आणले जाते. तिथे त्याची तरुण बहीणदेखील आलेली असते. आता मात्र लहान्याचा तोल ढासळतो आणि तो स्मशानात सर्वांच्या समक्ष बहिणीचा खून करून टाकतो. कारण लहान्याला माहीत असते की, जर तिला त्याने आता संपवले नाही, तर तिच्यावरही पत्नीप्रमाणे बलात्कार करून खून केला जाईल. आपले आयुष्यच इथे किडय़ामुंगीसारखे आहे या हतबलतेची त्याला जाणीव होते आणि त्यातून तो बहिणीला मारून टाकतो. लहान्या आता जोरजोराने ओरडतो, आाढाsश करतो. त्याच्या त्या टाहोत इथल्या व्यवस्थेविरुद्धचा संताप, आाढाsश आणि वेदना असते. अभिनयाच्या बाबत बोलायचे तर अभिनेता ओम पुरी यांचा हा अतिशय क्लास अभिनय असलेला चित्रपट होता. यात त्याच्या तोंडी चार-पाच वाक्ये असतील, पण आतून धुमसत असलेला हताश चेहऱयाचा आणि थंड डोळ्यांचा जबरदस्त नायक त्याने या चित्रपटात उभा केला आहे. तीच बाब नसिरुद्दीन शहा यांची.

या चित्रपटाची अनेक बलस्थाने आहेत. विजय तेंडुलकर यांची अतिशय बंदिस्त पटकथा प्रेक्षकांना जखडून ठेवते. चित्रपटाच्या शेवटी प्रस्थापित व्यवस्थेचा होणारा विजय, अगतिक समाजाचा मुडदा पाडून नामानिराळा राहणाऱया समाजाचे ाढाwर्य, बळी गेलेल्यांचे मूक रुदन अधोरेखित करणारी हतबलता तेंडुलकर इथे ठळकपणे करतात. मराठी मुलखातील सिनेमाची कथा असल्यामुळे ती आपल्याला जास्त जवळची वाटते. यातील अनेक पात्रे मराठी कलावंतांनी रंगवली आहेत. त्यात प्रामुख्याने मोहन आगाशे, अच्युत पोतदार, विनय आपटे, दीपक शिर्के, रीमा लागू, अरविंद देशपांडे, विहंग नायक, सुमंत मस्तकार यांचा उल्लेख करावा लागेल. चित्रपटाला अजित वर्मन यांचे संगीत होते. देशातील ग्रामीण भागातील राजकारणाचा एक कुरूप चेहरा इथे दिसतो. आदिवासींची पिळवणूक करताना इथला उच्चवर्गीय राजकारणी आणि त्याला साथ देणारा आरोग्य विभाग, मीडिया, न्याय व्यवस्था कशी एकत्र येते याचे प्रत्ययकारी चित्रण ‘आाढाsश’मध्ये पाहायला मिळते. यूटय़ूबवर हा उपलब्ध आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)