ज्येष्ठांना हवी सन्मानाची संध्याकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

‘म्हातारपणाचा काळ’ कठीणच असे उद्गार आपण अनेकदा ऐकतो आणि त्यावर वृद्धांच्या मानसिकतेला गृहीत धरतो; परंतु आपण एक गोष्ट बऱयाचदा पाहतो ती म्हणजे, काही ज्येष्ठ मंडळी त्यांच्याहून वयाने लहान किंवा पुढील पिढीतील मंडळींसोबत मिळून मिसळून वागत असतात. निवृत्तीनंतरची अर्थातच आयुष्याच्या संध्याकाळी अनेक स्वप्नं त्यांनी बघितलेली असतात. निवृत्तीनंतर काही करायचे ठरविलेले असते, पण शारीरिक, काwटुंबिक समस्यांमुळे ती कितपत पूर्ण होतात शंका असते.

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांची काळजी किंवा त्यांना मिळणाऱया सुविधांकडे काwटुंबिक, सामाजिक आणि शासन-प्रशासनाचे त्या त्या पातळीवर लक्ष असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिक हे देशाची संपत्ती आहे असे म्हटले जाते. 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा होतो.

कुठे तरुण पिढीशी संघर्ष असतो, तर कुठे ज्येष्ठांचा हेका असतो. हेच ते जनरेशन गॅप. दोन पिढय़ांतले अंतर म्हणतात ते असते. मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी व्हायला होते. व्हायला हवी.
आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे काही वर्गांत वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. आज विचार करता आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पस्तीस कोटी जवळपास आहे. त्यात चौदा ते पंधरा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. या वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे.

या समस्यांचेही आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर थकलेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते.

काही ज्येष्ठ नागरिक वानप्रस्थाश्रमाच्या पुढे गेलेले असतात, पण त्यांची जीवनासक्ती संपलेली नसते. खाणं, पिणं, कपडालत्ता, दागदागिने, प्रवास, लग्न, मुंज, सणवार अशा सर्व गोष्टींत त्यांना रस असतो, उत्साह टिकून असतो. स्वतःचे छंद, शौक पुरवून घेताना ज्येष्ठ मनोमन स्वतःची तरुण पिढीशी तुलना करतात. बरोबरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. अर्थातच ते काही वाईट नाही. त्यांनी आपल्याला आवडणारे उद्योग, छंद त्यांनी जोपासायचा प्रयत्न करावा. यातून त्यांचा उत्साह कायम राहून राहिलेले आयुष्य जगण्यासाठी बळ मिळते.

पण आता काळ बदलला आहे. आपल्या काळातील उदाहरणे देऊन तुलना करण्याचे टाळावे. आमच्या वेळी असे होते, आम्ही असे जगलो वगैरे दाखले देण्याचे टाळावे. काळ बदलला आहे. त्या बदलत्या काळाला स्वीकारले पाहिजे. त्या बदलत्या प्रवाहात बरोबर जायला लागते.

ज्येष्ठांनीही वयोभान ठेवणे गरज आहे. तरुण पिढीनेही त्यांच्या वयाचा, अनुभवाचा आदरच करायला हवा. आज आपण जे आहोत ते त्यांच्यामुळेच. नकळत कुठे त्यांचे मन दुखावले जाणार नाही हे लक्षात ठेवायला हवे. ते सांगतात ते प्रेमापोटीच ही भावना लक्षात घ्यावी, म्हणजे संघर्ष टळतो.

आपल्या आयुष्याची संध्याकाळ ही कुठे व कशी होणार याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. त्यामुळे सगळय़ांशी चांगले वागा. आपण एखाद्याशी जसे वागतो तसेच आपल्याशीही लोपं वागतात.

आपण केलेली कर्मं परत फिरून कधी ना कधी आपल्यासमोर उभी राहतातच, परतफेड होते. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, आताच विचार करावा, चांगले कर्म करत राहावे. सद्गुरू, परमेश्वरी कार्य करत रहावे हा कर्माचा सिद्धांत आहे.

आजची परिस्थिती अशी आहे, दोन-दोन मुले आहेत पण एकटा जबाबदारी घेत नाही, आज इथे, उद्या तिथे वाटणी करुन घेतात. आई एकाकडे, वडील दुसऱयाकडे.
ज्यांना दोन-तीन मुलीच आहेत तर कोणती एक मुलगी आईवडिलांचा सांभाळ करत नाही, काही दिवस एकीकडे तर काही दिवस दुसरीकडे. स्थैर्य नाही. संपत्तीचे वाटप कसे करणार याच्या कुरबुरी मुलींच्यात मनोमनी असते.

कुठे मुले आहेत, पण ते परदेशात नोकरी करतात, आर्थिक प्रलोभनात तिकडेच स्थायिक होतात. दुरूनच प्रेम दाखवतात. ना सुखात ना दुःखात सहभाग असतो. सत्तरीच्या घरात आईवडील. आजारपणात शेजारी येतात कामाला. काही मुले वृद्धाश्रमात आईवडिलांना ठेवतात. ते परदेशात असतात. केव्हा तरी ते येतील, आपल्याला घेउैन जातील ही मनात वेडी आशा धरुन असतात, पण अगदी त्यांच्या मृत्यूनंतरदेखील त्यांना यायला वेळ नसतो. वृद्धाश्रमात अंत्यविधी करायला सांगतात, पैसे पाठवितात. कारण सहवासातले प्रेम कधीच आटलेले असते. अशीही उदाहरणे आहेत. ही सत्य परिस्थिती आहे.

घरात ज्येष्ठ व्यक्ती भार होऊ लागल्यामुळे आज परिस्थितीत वृद्धाश्रमात वृद्ध कमी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढू लागली आहे आणि मग घरात मुलांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबा नाही त्या मुलांची रवानगी पाळणाघरात होते. त्यामुळेच पाळणाघरांची संख्याही वाढतेय.

ज्येष्ठांसाठी अनेक योजना/सवलती आहेत. त्या पुरेशा नाहीत. ज्येष्ठांसाठी बसभाडय़ात पन्नास टक्के सवलत आहे, पण आसन व्यवस्था नाही. रेल्वेत चाळीस टक्के सवलत, विमान भाडय़ात सवलत आहे. बँकेत अर्धा टक्का व्याज जास्त मिळते. काही ठिकाणी वृद्धाश्रमात सोय होते विनामूल्य. अनेक सरकारी योजना आहेत, पण त्या पुरेशा आहेत का? श्रावण बाळ योजना रक्कम अल्प आहे. वय वंदन योजनेत 15 लाखांची गंतवणूक करून दहा हजार पेन्शन. याला पेन्शन म्हणावे का? हे तर व्याज आपल्याच रकमेचे.

पण आताच बघा, गेल्या दीड वर्षाचा काळ कोरोनाचा गेला. तिसऱया लाटेने प्रवेश केला, पण अद्यापही अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत,ज्यांना शारीरिक दुर्बलतेने लस घेता आली नाही, त्यांचे लसीकरण केले नाही. न्यायालयाने सूचनेनंतर आता त्यांना घरी जाऊन लस देण्याचे धोरण ठरले. तोपर्यंत ते दुर्लक्षित होते. इतर ज्येष्ठांना बराच काळ कsंदावर प्रतीक्षा करावी लागत होती. लस संपली म्हणून दोन-दोनदा चकरा माराव्या लागल्या.

अगदी काही वर्षांपासून ईपीएस-95 पेन्शनसाठी चाललेला ज्येष्ठ नागरिकांचा लढा. अगदी पाचशे-सातशे, सतरा-अठराशे पेन्शन मिळते. अजूनही दहा हजार तरी पेन्शनची मागणी मान्य होत नाही. कित्येक पेन्शनरचा मृत्यू झाला. ते एकटे पडले आहे.

सरकार लाखो कोटी अनेक अनावश्यक बाबींवर खर्च करते, पण याबाबतीत सहानुभूतीने बघत नाही. त्यासाठी लाचारीने त्यांना वारंवार विनवण्या कराव्या लागत आहे. मंत्री, खासदार,आमदारांचे पेन्शन, भत्ते ज्या तत्परतेने वाढवण्याची कार्यवाही झाली तसे का होत नाही?

मध्यंतरी अर्थतज्ञ अनिल बोकील यांचे भाषणातून व्यक्त केलेले विचार ऐकलेय. अर्थातच ते सरकारला उद्देशून आहेत. वयाच्या साठीपर्यंत सर्वच नागरिकांनी सरकारला जे जे द्यावयाचे ते दिले. प्रत्येक गोष्टीवरचा कर दिला. देशाच्या उत्पन्नात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर सरकारची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती आहे. प्रत्येकाने या देशाला दोन-तीन नागरिक दिले आहेत. सरकारने या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देऊन दहा हजार रुपयांचे दरमहा मानधन द्यावे. ही मागणी नाही, तर प्रस्ताव आहे; जेणेकरून त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ सन्मानाची व्हावी! जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करीत असताना त्यांच्या समस्यांचा काwटुंबिक, सामाजिक आणि शासकीय स्तरावर विचार होणे अत्यावश्यक आहे.