मनतरंग – अर्धा पेला भरलेला!

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

हल्ली सुख आणि समाधानाची व्याख्या बदलत चालली आहे. याआधी सुख-समाधान हे मानण्यावर असायचं, पण आता याच गोष्टी भौतिक वादावर अवलंबून आहेत आणि व्यक्ती भौतिक वादावर अवलंबून नसेल तर त्या व्यक्तीची किंमत केली जाते. यात मानसिक स्वास्थ्य नक्की कोणाचं हरवलं आहे हे लक्षात येतंच.

मला तुमच्याकडे माझ्या मुलाला घेऊन यायचं आहे. कदाचित तो येणार नाही, पण त्याला खरोखर गरज आहे. मी आधी येऊन भेटू का?” सुहासकाका (नाव बदलले आहे) फोनवर अपॉइंटमेंट घेत होते. अपॉइंटमेंट दिल्याच्या दिवशी ठरल्या वेळेप्रमाणे ते आलेही. “माझा मुलगा आता तीस वर्षांचा आहे. हुशार आहे, पण कुठेही नोकरी करत नाही. आपल्या मर्जीनुसार वागतो. एकुलता एक आहे तरीही त्याला काही लाडाकोडात आम्ही वाढवलं नाही. शिस्तीतच वाढवलं आहे, पण आता तो इतका ध्ल्t ध् ण्दहूदत् गेला आहे की, विचारू नका.”

“म्हणजे काय? जरा स्पष्ट सांगाल का?” असं विचारल्यावर लगेचच ते म्हणाले, “म्हणजे त्याच्या आयुष्याला शिस्त नाही. बेफिकीर वृत्ती सगळी. बापाने कमावलंय, आईची पेन्शन… म्हणून आयतं बसून खाण्याची सवय त्याला लागली आहे. लग्न करायचं म्हणतोय तो. मुलगी बघितली आहे त्याने स्वतच. आणली घरात तर काय खायला घालणार आहे?” असे काहीशा उद्वेगानेच सुहासकाका बोलत होते.

ते पुढे त्यांचं म्हणणं आणि समस्या मांडतच होते. “अजून एक तुमच्या कानावर घालायचं आहे ते असं की, आमच्या मुलाचं आणि आमचं अजिबात पटत नाही. त्याचे आणि आमचे आयुष्याबद्दलचे विचार यामध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे. आम्हाला पैसा राखायला आणि त्याला उडवायला आवडतो. थोडक्यात काय तर आई-बापाच्या जिवावर मजा चालू आहे त्याची” सुहासकाका आता चांगलेच संतापले होते आणि रागाच्या भरात त्यांच्या डोळ्यांत खळ्कन पाणी आलं होतं.

त्यांचा संताप खरा होता आणि संतापाचे कारण त्यांचा मुलगा होता, पण त्याच्याबद्दल कोणतेही मत बनवण्याआधी त्याला काही गोष्टी विचारणेही गरजेचे होते. सुहासकाकांना पुढच्या वेळेस त्यांच्या मुलाबरोबर येण्यास सांगितले. पुढच्या वेळेसही सुहासकाका एकटेच आले. त्यांचा मुलगा काही त्यांच्या बरोबर आला नव्हता. या वेळेस त्यांच्या चेहऱयावर असहाय्यतेचे भाव दिसत होते. आल्या आल्याच त्यांनी, “मुलाला आणू शकलो नाही,” असे खिन्नपणे सांगितले. “काय करू मॅडम? मुलगा यायला तयार नाही.” त्यांना कारण विचारले असता ते लगेच म्हणाले, “ािढकेट शिकवायला जातो मूर्ख. शाळेत असतानाचं हे वेड. आम्ही त्याला ािढकेट खेळण्याचा मूर्खपणा करू दिला नाही, पण याने त्याच्याच शाळेतल्या गरीब मुलांना ािढकेट शिकवायला सुरुवात केली.”

“या आठवडय़ापासून केली आहे का?” असं त्यांना विचारताच त्यांनी पटकन, “नाही” अशी मान हलवली.
“अहो मॅडम, तो गेली पाच वर्षे शिकवतो आहे. त्याची शाळा तुटपुंजा पैसा त्याच्या हातावर टेकवते. त्यातच हा खूष.”

“हे आधी नाही बोललात?” असं विचारताच सुहासकाका एकदम शांत झाले. “त्यात काय सांगायचं? काय फायदा सांगून?” असं बोलून घसा खाकरून त्यांनी पुढे सुरुवात केली, “माझा मुलगा आहे त्यात समाधान मानणारा. मी तसा नाही. चांगल्या कंपनीत मोठय़ा पदावरून रिटायर्ड झाल्यावर फक्त महिनाभर मी विश्रांती घेतली. त्यानंतर आता गेली दोन वर्षे रिअल इस्टेटमध्ये एका बिल्डरबरोबर काम करतोय. माझा आजही महिना व्यवस्थित निघतो. शेवटी काय? पैसा महत्त्वाचा. तो घेत असलेली शिकवणी, मिळणारा थोडासा पैसा या गोष्टी माझ्या दृष्टीने नगण्य आहेत.” सुहासकाकांच्या या वाक्यानेच खरे समुपदेशन कोणाला आवश्यक होते हे स्पष्ट झाले.

हल्ली सुख आणि समाधानाची व्याख्या बदलत चालली आहे. याआधी सुख-समाधान हे मानण्यावर असायचं, पण आता याच गोष्टी भौतिकवादावर अवलंबून आहेत आणि व्यक्ती भौतिकवादावर अवलंबून नसेल तर त्या व्यक्तीची किंमतही केली जाते. सुहासकाकांचा मुलगा हे त्याचे जिवंत उदाहरण होते. त्यांच्या म्हणण्यानुसार जी खरी वस्तुस्थिती होती ती अशी की, त्यांचा मुलगा वास्तवदर्शी आणि सुजाण होता. त्याच्या जगण्याच्या, एकंदरीत राहणीमानाच्या कल्पना या ‘आंतरिक समाधान’ (घ्हही एatग्saिम्tग्दह) या संकल्पनेवर आधारलेल्या होत्या. त्याची अधिक चौकशी केली असता असं लक्षात आलं की, त्याला शहरापासून दूर एखाद्या गावात स्वतची ािढकेट कोचिंग अकादमी सुरू करायची होती, ज्याची सुरुवात तो आतापासूनच करत होता. त्याच्या गावात त्याने चौकशी करून एका शाळेत त्याची त्यासंदर्भात बोलणी सुरू होती. तसं बघायला गेलं तर नक्कीच तो आयतं बसून खात नव्हता. मात्र आपल्या वडिलांच्या मापदंडानुसार बघायला गेलं तर नक्कीच यशस्वी नव्हता, पण आनंदी आणि खुष होता.

“तुमच्या मुलाला रात्रीची झोप लागते का?” असं सुहासकाकांना विचारताच पटकन ते म्हणाले, “हो तर, चांगला पडल्या पडल्या झोपतो.”…“आणि तुम्हाला?” त्यावर ते किंचीत हसून म्हणाले, “उशिरा लागते. ज्या वेळेस माझी डील पूर्ण झालेली नसते त्या वेळेस मी रात्रीचा जागा असतो.”

“मी प्रत्येक काम पूर्ण करणारच” या त्यांच्या अतार्किक विश्वासाला खतपाणी घातलं गेलं होतं. ‘पैसा म्हणजेच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली’ या धारणेतून ते स्वतच्या मुलाकडे पाहत होते, पण त्याचा स्वतबद्दलचा आत्मविश्वास, शून्यातून उभं केलेलं त्याचं कर्तृत्व आणि दूरदृष्टी त्यांना समजत नव्हती. या सगळ्याच गोष्टी सुहासकाकांना समजावणं हे थोडं आव्हानात्मक होतं. कारण त्यांचा ‘स्व’ त्यावरच आधारलेला होता. तसंच त्याला एक कारुण्याचीही किनार होती. त्यांचं स्वतचं बालपण अतिशय कष्टात गेलं होतं. त्यामुळे त्यांच्या अंगावर अगदी सोळाव्या वर्षापासूनच जबाबदारी आली होती. मेहनत आणि फक्त मेहनत करूनच पै-पैसा त्यांनी कमावला होता आणि त्यामुळेच आपल्या वाटय़ाला आलेले कष्ट आपल्या पुढच्या पिढय़ांच्या वाटय़ाला येऊ नयेत म्हणून केवळ त्यांचा आटापिटा चालला होता.

सुहासकाका आणि त्यांच्या मुलामधली दरी मिटवणं गरजेचं होतं आणि ती दरी जेव्हा त्यांच्या मनातील स्वतच्या मुलाबद्दलची किल्मिषं दूर झाली तेव्हा कमी व्हायला लागली. त्यांना त्याच्या प्रयत्नांकडे डोळसपणे पहायला सांगितलं गेलं. सुहासकाकांना त्यांच्या मुलामध्ये असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून देण्यात आली आणि ‘त्याने वेगळी वाट निवडली आहे, जिच्यामध्ये तो खूष आहे’ हे पटवण्यात आले. “पण आताच्या काळात आर्थिक स्थैर्य नको का?” अशा त्यांच्या साहजिक प्रश्नावर “स्थैर्य हे शेवटी प्रामाणिक प्रयत्न, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावर अवलंबून असते. तुमच्या मुलाची जमेची बाजू म्हणजे त्याची असलेली ध्येयनिश्चितीच त्याला त्याच्या जीवनात पुढे नेईल” हा दिलासा सुहासकाकांना देऊन त्यांच्या मुलावर थोडा विश्वास ठेवण्यास त्यांना सांगण्यात आलं.

सुहासकाका निश्चिंत मनाने या वेळेस निघून गेले. काही दिवसांनी त्यांचा माझ्या मोबाइलवर एक मॅसेज आला होता. त्यांच्या मुलाने त्यांच्या नंबरवरून मॅसेज केला होता…“थँक्स मॅम!”
…आणि ही केस संपली.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
z [email protected]